भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन. क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो. शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्...
"भारत". कित्येक परकीय नराधमांनी भारतभूमीवर शाशन करण्याचे धाडस केले व प्रत्येक वेळी त्याला उधळून लावण्याचे काम याच मातीतल्या धाडसी वीरांनी केले. कित्येक वर्ष पारतंत्र्यात राहिलेल्या या मातृभूमीला अखेर स्वातंत्र्य मिळाले आणि या स्वातंत्र्याला कुणी एकाचा वाटा नसून यामागे कित्येक हौतात्म्यांचे कर्तुत्ववान असे शौर्य लाभलेले आहे.याच वीरांनी भारतमातेच्या चरणी आपल्या कर्तुत्त्व निष्ठेचे , सर्वसमर्पण वृत्तीचे , धैर्यशीलतेचे उदाहरण सादर केले आहेत. अश्या या मातृवीरांचे जितके कौतुक करावे तितके कमीच. त्याच बरोबर अश्या तमाम वीरांच्या मातांना सुद्धा माझे शतश: नमन. स्त्री. हा शब्द जेवढा उच्चारण्यात सोप्पा आहे, तेवढे तिला समजण्याचे रहस्य तेवढेच कठीण. मुळात पराक्रमी पुत्रांना जन्म देण्यापासून ते पराक्रम गाजवण्यापर्यंत याच मातीतल्या स्त्रियांनी आपल्या विशेष कार्याचे पडसाद संपूर्ण जगाला दाखविले. ...