Skip to main content

लोकमान्य टिळक - एक युगपुरुष| Lokmanya Tilak | Son of a Soil

                  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन.                  क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्‍या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो.                  शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य

लोकमान्य टिळक - एक युगपुरुष| Lokmanya Tilak | Son of a Soil



                 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन.
                 क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्‍या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो.
                 शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, "स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच". या घोषणेच्या गर्जनेनेच पाठीचे मणके ताठ होतात, अंगात वेगळाच रोमांच पसरतो, कान अगदी आवाजाच्या दिशेने लक्षपूर्वक सज्ज होतात. ज्यांच्या या गर्जनेतील आवाजानेचं कित्येकांच्या मनगटात बळ आणले , मनामानत राष्ट्रप्रेमाची  भावना ज्वलंत केली तसेच कित्येक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्तीत आपले संपूर्ण जीवन समर्पित केले असे भारतातील एकमेव लोकनेते व मार्गदर्शक म्हणजेच "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक".
                टिळकांचा जीवनप्रवास येथे थोडक्यात अथवा कमी शब्दात मांडणे ह्यामुळे त्यांच्यातील राष्ट्रभक्तीची भावना कळणे कठीण जाईल, त्यामुळे त्यांचे आत्मचरित्र तसेच त्यांचे लेख हे संक्षिप्त वाचून त्यांच्याबद्दल माहिती घेतलेली चांगली. भारतात इंग्रजांच्या मादक अत्याचार तसेच जुलमी राजवटींनी होरपळून जाणार्‍या भारतीय जनतेला बघून, भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय पर्याय नाही या विचारांना अनुसरून टिळकांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले. इंग्रज सरकारच्या बेकायदेशीरपणे लादलेल्या नियमांना आणि अन्यायाला त्यांनी प्रखर विरोध केला. इंग्रजांनी भारतात केलेल्या शिक्षण पद्धतीच्या प्रसारामागे इंग्रजांच्या व्यक्तीगत फायद्याचे गूढ त्यांना कळले होते  त्यावरील टिकेची झोळ तसेच इंग्रजांविरुद्ध असंतोष हे वारंवार त्यांच्या अग्रलेखातून ते परखडपणे मांडत , त्यावरून त्यांना  "असंतोषाचे जनक" म्हणून संबोधण्यात आले. त्यांचे केसरी व मराठा या वृत्तपत्रातील लेखांची उजळणी करता त्यांचे नेतृत्त्व ठळकरित्या दिसून येईल. त्यांच्या घोषणेतून आपल्या समाजाला बोध घेता येईल अश्या अनेक विचारांपैकी माझ्या महितीतले काही निवडक विचार येथे मांडावेसे वाटतात, ते म्हणजे.
१. आपल्या शिक्षणाचा, कौशल्याचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्या देशाला जास्तीत जास्त उपयोग करून दिल्यास देश प्रगतिच्या मार्गाला वळेल.या दिशेने कार्यरत असणे.

२. देशहिताच्या पिढ्या घडवता येईल ह्या उद्दिष्टाने मुलांवर संस्कार करणे. 

३. स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे जेणेकरून देशाची आर्थिक स्थिति सुधारण्यात      त्यांचा अधिक हातभार लागेल. (सध्याची "आत्मनिर्भर भारत अभियान" ही संकल्पना)

४. संस्कृती , धर्म  यांचे जतन करणे व सामाजिक बांधिलकी राखून एकमेकांना जवळ  आणून           राष्ट्राकार्यात हातभार लावण्यास प्रवृत्त करणे.

५. राष्ट्रकार्य म्हणजेच देवकार्य या विचारांनी देशकार्यात योगदान करणे.      

                स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्यांची  चतु:सूत्री साधने होती. तसेच आपल्या चळवळीचा एक भाग म्हणून ते या चतु:सूत्रीकडे पाहत असत. राष्ट्र म्हणजे काय या विषयी त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचे कौतुक करावे तितके कमीच. टिळकांनी १० डिसेंबर १९०१ च्या 'केसरी' च्या अग्रलेखात राष्ट्राची व्याख्या केली आहे , ती अशी - 

राष्ट्र  म्हणजे समुद्र  आणि नद्या यांनी मर्यादित पृथ्वीचा भाग अशी कोणी व्याख्या करत असेल तर ती चुकीची आहे. पृथ्वीच्या काही चौरस तुकड्यास राष्ट्र म्हणावयाचे तर सहारा वाळवंटासही राष्ट्र म्हटले पाहिजे किंवा उत्तर ध्रुवाजवळील बर्फाच्छादित प्रदेशासही राष्ट्र म्हणता येईल; परंतु राष्ट्र शब्दाचा अर्थ तसा नाही व नुसता लोकसमुदाय म्हणजेही राष्ट्र नव्हे, हेही लक्षात ठेविले पाहिजे. ज्या लोकसमुदायात एक प्रकारचा धार्मिक , सामाजिक किंवा राजकीय आपलेपणा भरलेला नाही, ज्याचे घटकावयव सामान्य बंधनांनी एकत्र बांधलेले नाहीत अथवा ज्यांच्या अंगात इतर समुदायाहून भिन्न अशा प्रकारचे वैशिष्ट्य वास करत नाही, ते लोक किंवा त्यांचा समुदाय कधीही राष्ट्र या संज्ञेस पात्र होत नाही.'

                       लोकमान्य टिळकांच्या अश्या विचारांनी प्रेरित होऊन कित्येकांनी आपले हात देशसेवेला लावले. तसेच गीतारहस्य , आर्यांचे मूलवसतिस्थान, ओरायण यांसारखे ग्रंथ रचून सामान्य जणांच्या विचारात भर पाडले. अश्या राजकारण, तत्वज्ञान, गणित, संस्कृत, खगोलशास्त्र, लेखन, न्यायशास्त्र, यांसारख्या अनेक विषयांमध्ये पारंगत असलेले लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


परकीयांच्या अन्यायाला एकमुखाने लढले 
मशाल घेऊन स्वातंत्र्याची पाऊल पुढे पढले

स्वकीय विद्याघरं काढूनी ज्ञानी रोवला पाया
घडवून पिढी राष्ट्रप्रेमाची मनी कोरली माया

जागे कराया लोकांसी विचार त्यांनी रचले
केसरीच्या लेखामधूनी मनामनांत ते छपले

अधर्मीयांचा नाश कराया रची गीतेचा लेख
कानी ठेवला मंत्र दामूने सूड घेतला चोख

धर्म फुट पाडणीचे, प्रयत्न त्यांनी टोचले
एक कराया सर्वांसी उत्सव त्यांनी वेचले

ग्रंथ नव्हे उपदेश असे ते करी धर्म सुधारण 
गीतारहस्य रचून दिली कर्मयोगी शिकवण

अनेकदा सोसल्या यातना बंदिवासाच्या भोगाने 
लढा दिला त्या जुलमांना रगरगत्या अंगाने

पुनःश्च हरी ओम म्हणूणी राष्ट्रकार्य जुंपले
चतु:सूत्राचे आकलन करुनी चळवळीत ते रमले

स्वराज्याच्या ध्येयासाठी हवी एक भावना
जहालवादी विचारसरणी हीच एक योजना

वाट दाखवून स्वातंत्र्याची लोकरत्न हरले
लोकांचे ते लोकमान्य स्वर्गलोकी सरले



- अमित गंगावणे.






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर | Savarkar | Poem on History Maker - मराठी

                      भारतीय ईतिहासातील अजरामर कामगिरीबद्दल आणि शौर्याबद्दल सदैव लोकांच्या मनी ज्वलंत  असणार्‍या व अश्या कर्तुत्त्वाने जगभरात नावलौकिक असणार्‍या तमाम वीरांना माझे शतशः नमन.                      भारतमातेचे खरेच कौतुक करावे जिने आजपर्यंत तमाम वीरपुत्रांना जन्म दिला आणि समाजासमोर एक आदर्श उभा केला. त्यांची किर्ती कधीच विसरण्यायोग्य नाही तसेच त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ह्या जितक्या मांडू तितक्या कमीच. हौतात्म्य पत्करून मातृभूमीला परकीय बंधनातून मुक्त करणार्‍या अमाप क्रांतीकारकांपैकी एक थोर आणि जाज्वल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर".                         सावरकरांबद्दल लिहिण्यास शब्द कमी पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि पराक्रम . अश्या  ह्या हौतात्म्यांच्या चरणी माझ्याकडून काही प्रयत्न.      ईतिहासाच्या पानावरती ठळक अक्षर उमटले धन्य झाली भगूर भूमी सावरकर जिथे जन्मले बालपणीच्या काठावरती मुकली ती मातृ माया वहिनीच्या त्या आश्रयातून भेटली सौम्य छाया                         अष्टभुजेच्या चरणावरती शपथ घेतली क्रांतीची