भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन. क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो. शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्...
"छत्रपती शिवाजी महाराज की" या वाक्यावर "जय !" बोलल्याशिवाय कोणी रहावणार नाही. कारण हे एक असे स्फूर्तीजनक वाक्य आहे जे महाराष्ट्रातील नव्हे तर देशापलीकडे असणार्या तमाम शिवभक्तांसाठी एक कानमंत्र आहे. ६ जून १६७४ रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा अगदी अश्याच उत्साहाने पार पाडला गेला. त्यावेळी फक्त स्वराज्यातील प्रजा नव्हे तर दूर पलीकडील राज्यप्रतिनिधी , सरदार , विदेशी व्यापारी तसेच कित्येक जनसमुदाय हा सोहळा बघण्यास उत्सुक होतं. खरतरं सोहळा हे निमित्तचं ,महाराजांच्या सावलीचे देखील दर्शन मिळाल्यास स्वतःला भाग्यवंत समजणारी ही रयत. आजही या सोहळ्याला एखाद्या उत्सवाप्रमाणे असंख्य जनसमुदाय त्याच जल्लोशात साजरा करतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून ते त्यांच्या अंतिम कारकीर्दीपर्यंत असंख्य मनामनांत एका सामर्थ्यशाली राजासोबत एक आदर्श व्यक्तिम...
Comments
Post a Comment