भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन. क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो. शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य
भारतीय ईतिहासातील अजरामर कामगिरीबद्दल आणि शौर्याबद्दल सदैव लोकांच्या मनी ज्वलंत असणार्या व अश्या कर्तुत्त्वाने जगभरात नावलौकिक असणार्या तमाम वीरांना माझे शतशः नमन.
भारतमातेचे खरेच कौतुक करावे जिने आजपर्यंत तमाम वीरपुत्रांना जन्म दिला आणि समाजासमोर एक आदर्श उभा केला. त्यांची किर्ती कधीच विसरण्यायोग्य नाही तसेच त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ह्या जितक्या मांडू तितक्या कमीच. हौतात्म्य पत्करून मातृभूमीला परकीय बंधनातून मुक्त करणार्या अमाप क्रांतीकारकांपैकी एक थोर आणि जाज्वल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे "स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर".
सावरकरांबद्दल लिहिण्यास शब्द कमी पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि पराक्रम . अश्या ह्या हौतात्म्यांच्या चरणी माझ्याकडून काही प्रयत्न.
ईतिहासाच्या पानावरती ठळक अक्षर उमटले
धन्य झाली भगूर भूमी सावरकर जिथे जन्मले
बालपणीच्या काठावरती मुकली ती मातृ माया
वहिनीच्या त्या आश्रयातून भेटली सौम्य छाया
अष्टभुजेच्या चरणावरती शपथ घेतली क्रांतीची
मातृभूमीला मुक्त करूनी फेडू ऋण या मातीची
विलायतेच्या होळीमधुनी देती चेतावणी
टिळक ,परांजपे संग पेटवती नवक्रांतीची धुनी
स्वातंत्र्याच्या हितापाई समुद्र ओलांडले भयाण
शत्रूच्या त्या गोठ्यामद्धे निर्भयतेने केले प्रयाण
क्रांतिच्या ह्या यद्नकुंडात कित्येक गेले वीर होऊनी
मार्सेलीस च्या तटावरती आठवले जोसेफ मॅझिनी
संघटीत झाले ते हात भर पडला प्रत्येकं ज्ञानात
विचारांचे ते अभिनव भारत दडले कित्येकं मनात
स्वातंत्र्यसमराची लिहून गाथा बनविले नवे अस्त्र
ठिणगी पेटली क्रांतीची मनी उठले कित्येक शस्त्र
स्वातंत्र्याचा धडा शिकविता त्या मदनलालासी
हौतात्मा होऊनी स्मरणात राहील सर्व भारतासी
चकवा देऊनी शत्रूला ती उडी मारीली खोलं
धाडस वृत्ती बघूनी अथांग सागर झाला अबोलं
अंदमानच्या तुरुंगात किती सोसल्या यमयातना
शिखारे येती अंगावरती आठवूणी त्या वेतना
भिंतीच्या त्या निर्जीव अंगी रचे कविचे सार
एका एका शब्दामधूनी महाकाव्ये रचिली चार
रूढींच्या त्या गुलामीचा काळ तो अखेर संपला
स्वतंत्रतेच्या तत्त्वासाठी तोडिले सर्व शृंखला
मातृभूमीला वंदन करुनी श्वास अखेर घेतला
ज्ञानाचा हा विशाल सूर्य गगनी अस्त पावला
अंगी बाळगू तुमची वाणी, भर पाडू ज्ञानात विशालं
ज्वलंत राहील सदैव मनी, त्या विचारांची मशालं.
- अमित गंगावणे.
Excellent 👍
ReplyDeleteThank You.
DeleteNice....
ReplyDeleteThanks.
DeleteKhup Chan👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete