Skip to main content

लोकमान्य टिळक - एक युगपुरुष| Lokmanya Tilak | Son of a Soil

                  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन.                  क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्‍या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो.                  शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य

शिवराज्याभिषेक सोहळा | Festival of Maratha Empire

                    "छत्रपती शिवाजी महाराज की" या वाक्यावर "जय !" बोलल्याशिवाय कोणी रहावणार नाही. कारण हे एक असे स्फूर्तीजनक वाक्य आहे जे महाराष्ट्रातील नव्हे तर देशापलीकडे असणार्‍या तमाम शिवभक्तांसाठी एक कानमंत्र आहे. ६ जून १६७४ रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा अगदी अश्याच उत्साहाने पार पाडला गेला. त्यावेळी फक्त स्वराज्यातील प्रजा नव्हे तर दूर पलीकडील राज्यप्रतिनिधी , सरदार , विदेशी व्यापारी तसेच कित्येक जनसमुदाय हा सोहळा बघण्यास उत्सुक होतं. खरतरं सोहळा हे निमित्तचं ,महाराजांच्या सावलीचे देखील दर्शन मिळाल्यास स्वतःला भाग्यवंत समजणारी ही रयत. आजही या सोहळ्याला एखाद्या उत्सवाप्रमाणे असंख्य जनसमुदाय त्याच जल्लोशात साजरा करतात.
                     हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून ते त्यांच्या अंतिम कारकीर्दीपर्यंत असंख्य मनामनांत एका सामर्थ्यशाली  राजासोबत एक आदर्श व्यक्तिमत्व उभे केले. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा प्राचीन परंपरेनुसार पार पडला. तसेच त्यातील काही प्रसंगाचे वर्णन एका छोट्या प्रयत्नातून करू इच्छितो.

अभिषेक कराया देवाला मुहूर्त काढी आगळा
देवाच्या त्या भक्तांनी आरंभ केला सोहळा

जमले ते विविध मंडळी सरदार कोणी सज्जन
रयतेच्या त्या राज्यासाठी जमले सर्व प्रजाजन

वंदन करूनी प्रथम आईला भेट गाठी विविध मंदिरी
दर्शन करीती भवानी आईचे सुवर्ण छत्र अर्पण करी

सप्त धातूंच्या तुला करुणी शोभा वाढवी समारंभ
मंत्रोचारण करून ब्राहमणे  विधी करी प्रारंभ

स्मरण करुणी कुलदेवासी आरंभ झाला सोहळा
शुभ्र वस्त्रे अंगी शोभती गळ्यात कवडयांच्या माळा

छत्र धराया छत्रपतींचे अपार निष्ठा हवी मनावर
विराजले ते महाराज त्या सुवर्ण मढींच्या मंचावर

अभिषेक करती अष्टप्रधाने पवित्र जलकुंभ घेऊनी
पंचारती त्या ओवाळी राजमहाली सोळा सुवासिनी 

जडजवाहीर ,अलंकार ते राजमुकुट परीधाने
पुजा करूनी शस्त्रांचे प्रस्थान करी वैभवाने

मुहूर्त वेळी राज दालनी प्रवेश करी महाराजे
३२ मणी सुवर्ण पत्री मढवी ते सिंहासन साजे

विराजती त्या सिंहासनी महाराज असे शोभती  
लखलखणारे तेज घेऊनी सुर्यदेव जसे उगवती

करूनी जयघोष राजाचे आसमंत ते गहिवरले
घ्यावयास आशिर्वाद प्रजेचे महाराज हि सरसवले

गडगडणार्या तोफातून गगनी भिडे आवाज संचारी
मुख्य पुरोहित गागाभट्ट 'शिवछत्रपती' मुखी उच्चारी

धनभेट देया सर्वजनासी राजे स्वयं चाले
अभिवादन कराया राजासी मंत्रीगणही आले

स्वार होऊनी अश्वावर जगदिश्वरी निघाले
तेथून स्वारी हत्तीवरूनी रायगडी परतले

अष्टप्रधाने असे सोबती विधीसंपन्न करी भोवती
भगवे झेंडे घेऊनी सैन्य रायगडी पाऊले टाकती 

रायगडी ती स्वारी येता जनसमुदाय हे बहरले
वर्षाव करूनी पुष्पांचा जयघोष कराया जमले

साक्षात पाहूनी भव्य सोहळा दिव्य क्षण हे गवसले
दर्शन घेऊन विविध मंदीरा महाराज महाली परतले.

                        छत्रपती शिवाजी महाराज की, जय ! जय भवानी, जय शिवाजी.

                  - अमित जोशी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लोकमान्य टिळक - एक युगपुरुष| Lokmanya Tilak | Son of a Soil

                  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन.                  क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्‍या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो.                  शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य

स्वातंत्र्यवीर सावरकर | Savarkar | Poem on History Maker - मराठी

                      भारतीय ईतिहासातील अजरामर कामगिरीबद्दल आणि शौर्याबद्दल सदैव लोकांच्या मनी ज्वलंत  असणार्‍या व अश्या कर्तुत्त्वाने जगभरात नावलौकिक असणार्‍या तमाम वीरांना माझे शतशः नमन.                      भारतमातेचे खरेच कौतुक करावे जिने आजपर्यंत तमाम वीरपुत्रांना जन्म दिला आणि समाजासमोर एक आदर्श उभा केला. त्यांची किर्ती कधीच विसरण्यायोग्य नाही तसेच त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ह्या जितक्या मांडू तितक्या कमीच. हौतात्म्य पत्करून मातृभूमीला परकीय बंधनातून मुक्त करणार्‍या अमाप क्रांतीकारकांपैकी एक थोर आणि जाज्वल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर".                         सावरकरांबद्दल लिहिण्यास शब्द कमी पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि पराक्रम . अश्या  ह्या हौतात्म्यांच्या चरणी माझ्याकडून काही प्रयत्न.      ईतिहासाच्या पानावरती ठळक अक्षर उमटले धन्य झाली भगूर भूमी सावरकर जिथे जन्मले बालपणीच्या काठावरती मुकली ती मातृ माया वहिनीच्या त्या आश्रयातून भेटली सौम्य छाया                         अष्टभुजेच्या चरणावरती शपथ घेतली क्रांतीची