भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन. क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो. शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य
आई. आपल्या जिवनातील एक थोर व्यक्तिमत्व तसेच आपली पहिली गुरू, जिने आपल्यावर नऊ महिने उदरात आणि त्यापुढे आपल्या आयुष्यात अनेक संस्कार घालून आपल्याला घडवले. आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर तिच्या संस्कारांची छाप असतेचं.एवढेचं नव्हे तरं आई ह्या शब्दातील भावनेचा अंगीकार केल्यावर तिचा पुढचा सगळा प्रवास हा ती आपल्यासाठी अर्पण करते. सामान्य जगात वावरतांना आपल्या हातून घडणार्या कित्येक सकारात्मक गोष्टीत तिचा मोलाचा वाटा असतो. तिच्या प्रत्येक भावनांचे स्वरूप हे सदैव आपल्या पाठीशी असते . ह्या उपकरांची परतफेड आपण कित्येक जन्म घेऊन सुद्धा करू शकत नाही उलट तिच्या मायेचा स्पर्श सदैव मिळत राहावा या लोभापाई पुढचे अनेक जन्म तिचेच चिंतन करतो.
अश्याच एका आईचे जगाजसोर उभे असलेले उदाहरण हे तिच्या अफाट किर्तीचे , शौर्याचे आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवते .त्यांनी दिलेल्या संस्काराच्या बळावर केवळ ह्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एका आदर्शवान राजाचे नेतृत्व लाभले व त्याच राजाच्या नेतृत्त्वाखाली अखंड स्वराज्य स्थापन झाले. त्या आईच्या मायेने कायम स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यासोबत इतरांसाठी जगायचे कसे हे देखील शिकवले. तसेच आपल्या वैयक्तीत भावनांचा आपल्या कर्तव्यावर परिणाम होऊ न देता धैर्याने आणि खंबीरपणाने येणार्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा विशेष गुण महाराजांना शिकवणार्या स्वराज्याच्या राजमाता म्हणजेच "माँसाहेब जिजाऊ भोसले".
जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये सिंदखेड येथे लखुजीराव जाधव यांच्या घराण्यात झाला. राजमाता जिजाऊंच्या जन्मानेच महाराष्ट्रातील प्रजेला परकीय गुलामीला छाटणार्या तलवारी सोबत न्यायदेवीच्या अधिपत्याखाली नांदण्याचे भाग्य लाभले. वडिलांकडून त्यांनी शस्त्र , शास्त्र तसेच राजनैतिक कारभाराचे प्रशिक्षण घेतले. मुळातच बुद्धिवान, धैर्यवान या गुणांमुळे त्या सर्व बाबतीत उत्तम बनल्या. इ.स. १६०५ मध्ये शहाजीराजांशी त्यांचा विवाह झाला. पुढे देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा संकल्प शिवाजी महाराजांच्या रूपाने दर्शवला. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना वयाच्या १४ व्या वर्षी पुण्याची जहागीर सुपूर्त करून आऊसाहेबांवर महाराजांची जबाबदारी टाकली त्यामुळे आऊसाहेबांच्या समवेत सर्व राज्यकारभार पार पडले जाई. राजयकारभाराची सर्व सूत्रे पार पाडताना तसेच न्यायनिवाडा करताना त्यांनी सदैव शिवाजी महाराजांना सोबत बसवले. दादाजी कोंडदेव यांच्या सोबत पुणे शहराचे परिवर्तन केले. गोर गरीब जनतेला त्यांनी आईसारखा आधार दिला, बेकार हातांना काम दिले. त्यांच्या समस्या सोडवण्यात ते नेहमी तत्पर असे. शिवाय प्रतिष्ठित व कुख्यात गुंडांचा त्यांनी योग्य बंदोबस्त केला. वेळीचं सरळ भाषा न समजणार्यांना त्यांनी ठार मारावयास कमी केले नाही. अश्यांच्या मुलांना तितक्याच मायेने त्यांनी जवळ केले. त्यांना शहाणा केला व स्वराज्यास्थापनेच्या कार्यात हातभार लावण्यास समर्थ केले. अश्याच कित्येक मावळ्यांना त्यांनी जिव्हाळ्याने वागवले. पुढे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली मावळ्यांनी रक्ताचे एक थेंबही न सांडता तीन किल्ले स्वराज्यात प्रथम दाखल केले. त्याचसोबत महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाची भर असे.
आऊसाहेबांच्या प्रत्येक शिकवणीतून आपणास धडे घेण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत. त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरी लेखणी अपुरी पडेल असा त्यांचा नावलौकिक . कर्तव्यदक्षता , नीतीमत्ता , मुत्सद्दी , स्थितप्रज्ञ , आत्मविश्वास अश्या अनेक गुणांच्या बळावर स्वराज्याचा पाया रोवणार्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेबांना माझा त्रिवार मुजरा व त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
जय जिजाऊ, जय शिवराय !
- अमित गंगावणे.
Comments
Post a Comment