Skip to main content

लोकमान्य टिळक - एक युगपुरुष| Lokmanya Tilak | Son of a Soil

                  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन.                  क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्‍या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो.                  शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य

राणी लक्ष्मीबाई | RAANI LAXMIBAI - QUEEN OF JHANSI


                             "भारत". कित्येक परकीय नराधमांनी भारतभूमीवर शाशन करण्याचे धाडस केले व प्रत्येक वेळी त्याला उधळून लावण्याचे काम याच मातीतल्या धाडसी वीरांनी केले. कित्येक वर्ष पारतंत्र्यात राहिलेल्या या मातृभूमीला अखेर स्वातंत्र्य मिळाले आणि या स्वातंत्र्याला कुणी एकाचा वाटा नसून यामागे कित्येक हौतात्म्यांचे  कर्तुत्ववान असे शौर्य लाभलेले आहे.याच वीरांनी भारतमातेच्या चरणी आपल्या कर्तुत्त्व निष्ठेचे , सर्वसमर्पण वृत्तीचे , धैर्यशीलतेचे उदाहरण सादर केले आहेत. अश्या या मातृवीरांचे जितके कौतुक करावे तितके कमीच. त्याच बरोबर अश्या तमाम वीरांच्या मातांना सुद्धा माझे शतश: नमन.
                             स्त्री. हा शब्द जेवढा उच्चारण्यात सोप्पा आहे, तेवढे तिला समजण्याचे रहस्य तेवढेच कठीण. मुळात पराक्रमी पुत्रांना जन्म देण्यापासून ते पराक्रम गाजवण्यापर्यंत याच मातीतल्या स्त्रियांनी आपल्या विशेष कार्याचे पडसाद संपूर्ण जगाला दाखविले. एके काळी समाजाने बांधलेल्या "चूल आणि मूल" या बंधनातून स्वतःला मुक्त करून देशसेवेत आपले प्रथम योगदान देण्याचे धाडस देखील यांनी स्वत:च मिळवले. अश्याच धाडसी , पराक्रमी, युद्धकुशल, बुद्धिमत्ता यांनी जगाला भारावून टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे  " झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ".     
                            खरेतरं येथे मी त्यांच्या जन्माबद्द्ल, त्यांच्या बालपणापासून ते विवाहपर्यंत घडलेल्या गोष्टींबद्दल  फारशी माहिती लिहीत नाही. कारण ते तुम्हाला कुठेही अगदी सहज रित्या सापडेल एवढी त्यांची महान कीर्ती आहे . येथे मी राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यातील काही वळणे आणि त्यावर गाजवलेल्या पराक्रमाच्या गोष्टी, त्यांचे क्रांतिकारक विचारभावना व त्यांची आत्मसंकल्पना यांचा  बोध कसा घेता येईल हे स्पष्ट करू इच्छितो. 
                              नावात लक्ष्मी आणि कर्तुत्वाने दुर्गा असणार्‍या अश्या उल्लेखनीय शौर्‍यापुढे व धाडसी वृत्तीसमोर ईंग्रजांनासुद्धा  झुकावे लागले. युद्धशास्त्रात प्रावीण्य , विलक्षण चपळता , दयाळू व दानशूर व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंवर स्वत: ईंग्रजांनीसुद्धा 'दि क्वीन ऑफ झांसी" हे पुस्तक लिहिले आहे यावरून त्यांचे कर्तुत्त्व किती मोठे आहे, हे आपण समजू शकतो. आयुष्याच्या वाटेवर पुत्रवियोगा पाठोपाठ पतीचे देखील निधन झाल्यावर तिथे त्या खच्ची गेल्या नाही. उलट अश्या वेळी राणी धर्माचे पालन करीत राजगादीला व प्रजेला सांभाळले. राणी लक्ष्मीबाईंनी सर्वप्रथम प्रजेला विशेष प्राधान्य दिले. ईंग्रजांच्या वाढत्या राजवटीमुळे त्यांना महल देखील सोडावा लागला. मातृभूमीला तसेच सामान्य प्रजेला होणार्‍या त्रासामुळे ईंग्रजांविरुद्ध जाऊन बंड पुकारण्याचा त्यांनी निश्चय केला. यातूनच क्रांतिकाराची भावना उफाळली. व त्याची ठिणगी पेटवली ती १८५७ साली मेरठ येथील ईंग्रजांच्या सैन्यातील भारतीय क्रांतिकारकांनी आणि त्यातून घडले भारताचे पहिले स्वातंत्र्यसंग्राम. ईंग्रजांविरुद्ध झालेल्या चकमकीत प्रथम त्यांना परभावही पत्करावा लागला. पण त्या निराश झाल्या नाही तसेच त्यांचे मनोबल तुटले नाही. उलट त्यांनी योजना आखून पुन्हा हल्ला केला. त्यांच्या शौर्याचे उदाहरण द्यायचे झाले तर युधमैदानी घोड्याची लगाम दातांनी धरून दोन्ही हातांनी तलवार चालवीत ते असंख्य ईंग्रज सैनिकांचे मस्तक छाटत होते. पण मात्र यात त्यांना जीव गमवावा लागला. त्यांनी एकदाही माघारी जाण्याचा प्रयत्न केला नाही ,तसेच सहसा शरणागती पत्करली नाही मुळात लढताना त्यांचे शौर्य बघून खुद ईंग्रज सेनानी "हयू रोज" देखील हैराण झाला. अशीच लढाई गाजवताना रक्तबंबाळ होऊन अखेरीस त्यांनी देह ठेवला. ईंग्रजांच्या हाती आपला देह सापडता कामा नये अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांच्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिली. अश्या ह्या भारताच्या प्रथम क्रांतिकारी ज्योतीचा प्रकाश अखेर लोप पावला पण त्यांच्या पराक्रमाची ज्योत ही प्रत्येक मनात अखंड ज्वलंत राहीली.
                             एखाद्या निश्चयाकडे एकाग्रचित्तेने पाऊल ठेऊन शेवटच्या श्वासापर्यंत त्याला मिळवण्याची जिद्द ठेवणे याचे उदाहरण राणी लक्ष्मीबाई देऊ इछितात.शत्रूच्या वाढत्या संख्येकडे बघून आपले शौर्य कधीच डगमगत नाही हे राणी लक्ष्मीबाईंनी दाखवून दिले. तसेच कित्येक स्त्रियांना युद्धकला , घोडदौड शिकवून स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्याची संधी देऊन देशासाठी पराक्रम करण्याचे अवसर दिले. एक अश्या राणी ज्यांच्या नावाने झांशी ओळखली जाते,  अश्या कर्तुत्ववान महिलेकडून शिकण्यासारखे खूप आहे. प्रत्येक आईने, बहिणीने ,पत्नीने व मुलीने एखाद्या गोष्टीचे धाडस करून समाजातील विरोधकांच्या विचारांवर पाय रोवून एकाग्रचित्तेने त्या गोष्टीला मिळवण्याचे प्रयत्न केल्यास त्या स्त्री मध्ये खरेचं राणी लक्ष्मीबाई अवतरल्या असे समजावे. राणी लक्ष्मीबाईंच्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन.

                           " प्रतिकार कराया शत्रूला ती होती एक मर्दानी
                             स्वतंत्र कराया मातीला ती बनली आई भवानी
                              
                            प्रयत्न करती अनेकदा ते कागदी मारे करुनी
                            न झुकवले शौर्य ते त्या जुलमी राजवटींनी

                            न झुकणार्‍या त्या डोळ्यांवर होती एक पुकार
                            बंड करुनी नराधमांसी खदडून टाकू हद्दपार 

                            परकीय गुलामी हटवून टाकू हाच एकला ध्यासं
                            स्वतंत्रतेच्या मातीवरती हवा मोकळा श्वास    
                            
                            ठिणगी पेटली क्रांतीची उद्रेक झाला मनी 
                            सज्ज झाले लढवईय्ये मातृभूमीला वंदूनी 
                        
                            शौर्य पाहता रणांगणी थरकाप उडाला गगनी
                            आच्छादली ती युद्धभूमी रक्तधारा वाहुनी
                            
                            अहंकार तो परकियांचा तिने मैदानी तोडला.
                            वंदन करुनी मातृभूमीला प्राणदेह सोडला".
                          

- अमित गंगावणे. 
                           



                            

                                                           
                             


                            

                             

Comments

Popular posts from this blog

लोकमान्य टिळक - एक युगपुरुष| Lokmanya Tilak | Son of a Soil

                  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन.                  क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्‍या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो.                  शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य

स्वातंत्र्यवीर सावरकर | Savarkar | Poem on History Maker - मराठी

                      भारतीय ईतिहासातील अजरामर कामगिरीबद्दल आणि शौर्याबद्दल सदैव लोकांच्या मनी ज्वलंत  असणार्‍या व अश्या कर्तुत्त्वाने जगभरात नावलौकिक असणार्‍या तमाम वीरांना माझे शतशः नमन.                      भारतमातेचे खरेच कौतुक करावे जिने आजपर्यंत तमाम वीरपुत्रांना जन्म दिला आणि समाजासमोर एक आदर्श उभा केला. त्यांची किर्ती कधीच विसरण्यायोग्य नाही तसेच त्यांच्या पराक्रमाच्या गाथा ह्या जितक्या मांडू तितक्या कमीच. हौतात्म्य पत्करून मातृभूमीला परकीय बंधनातून मुक्त करणार्‍या अमाप क्रांतीकारकांपैकी एक थोर आणि जाज्वल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर".                         सावरकरांबद्दल लिहिण्यास शब्द कमी पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि पराक्रम . अश्या  ह्या हौतात्म्यांच्या चरणी माझ्याकडून काही प्रयत्न.      ईतिहासाच्या पानावरती ठळक अक्षर उमटले धन्य झाली भगूर भूमी सावरकर जिथे जन्मले बालपणीच्या काठावरती मुकली ती मातृ माया वहिनीच्या त्या आश्रयातून भेटली सौम्य छाया                         अष्टभुजेच्या चरणावरती शपथ घेतली क्रांतीची