Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

लोकमान्य टिळक - एक युगपुरुष| Lokmanya Tilak | Son of a Soil

                  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देऊन आमच्या पिढीला स्वातंत्र्याचा मोकळा श्र्वास प्रदान करणार्या भारतमातेच्या असंख्य ज्ञात अज्ञात मातृवीरांना माझे शतश: नमन.                  क्रांतिकारकांच्या ईतिहासातील अजरामर कामगिरींबद्दल लिहावे तेवढे कमीच. कधी कधी शब्द सुद्धा कर्तुत्त्वाला पुरून उरत नाही पण अश्या वेळी मनातील त्यांच्याविषयी असणार्‍या आदराला आणि आदर्शाला शेवटी शब्दाचे वळण देऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. सोबत त्यांच्या विचारांच्या गाथा मांडून त्यांना आत्मसात करण्याचा संकल्प मनाशी बाळगण्याचे कार्य करू शकतो. अश्या क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखेच आहे. पण त्यांच्या विचारांच्या धारा ह्या प्रत्येक मनावर उमटवून देशकार्यात त्याचा हातभार लागेल एवढाच प्रयत्न करू इछितो.                  शाळेतील वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये एका महान क्रांतिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवताना त्यांची एक प्रसिद्ध अशी घोषणा ही सर्वांनीच ऐकली असेल, " स्वराज्य, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" . या घोषणेच्य

राणी लक्ष्मीबाई | RAANI LAXMIBAI - QUEEN OF JHANSI

                             "भारत". कित्येक परकीय नराधमांनी भारतभूमीवर शाशन करण्याचे धाडस केले व प्रत्येक वेळी त्याला उधळून लावण्याचे काम याच मातीतल्या धाडसी वीरांनी केले. कित्येक वर्ष पारतंत्र्यात राहिलेल्या या मातृभूमीला अखेर स्वातंत्र्य मिळाले आणि या स्वातंत्र्याला कुणी एकाचा वाटा नसून यामागे कित्येक हौतात्म्यांचे  कर्तुत्ववान असे शौर्य लाभलेले आहे.याच वीरांनी भारतमातेच्या चरणी आपल्या कर्तुत्त्व निष्ठेचे , सर्वसमर्पण वृत्तीचे , धैर्यशीलतेचे उदाहरण सादर केले आहेत. अश्या या मातृवीरांचे जितके कौतुक करावे तितके कमीच. त्याच बरोबर अश्या तमाम वीरांच्या मातांना सुद्धा माझे शतश: नमन.                              स्त्री. हा शब्द जेवढा उच्चारण्यात सोप्पा आहे, तेवढे तिला समजण्याचे रहस्य तेवढेच कठीण. मुळात पराक्रमी पुत्रांना जन्म देण्यापासून ते पराक्रम गाजवण्यापर्यंत याच मातीतल्या स्त्रियांनी आपल्या विशेष कार्याचे पडसाद संपूर्ण जगाला दाखविले. एके काळी समाजाने बांधलेल्या "चूल आणि मूल" या बंधनातून स्वतःला मुक्त करून देशसेवेत आपले प्रथम योगदान देण्याचे धाडस देखील यांनी स्वत:च म

स्वराज्यजननी जिजामाता | Mother of Bravery

                            आई. आपल्या जिवनातील एक थोर व्यक्तिमत्व तसेच आपली पहिली गुरू, जिने आपल्यावर नऊ महिने उदरात आणि त्यापुढे आपल्या आयुष्यात अनेक संस्कार घालून आपल्याला घडवले. आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर तिच्या संस्कारांची छाप असतेचं.एवढेचं नव्हे तरं आई ह्या शब्दातील भावनेचा अंगीकार केल्यावर तिचा पुढचा सगळा प्रवास हा ती आपल्यासाठी अर्पण करते. सामान्य जगात वावरतांना आपल्या हातून घडणार्‍या कित्येक सकारात्मक गोष्टीत तिचा मोलाचा वाटा असतो. तिच्या प्रत्येक भावनांचे स्वरूप हे सदैव आपल्या पाठीशी असते . ह्या उपकरांची परतफेड आपण कित्येक जन्म घेऊन सुद्धा करू शकत नाही उलट तिच्या मायेचा स्पर्श सदैव मिळत राहावा या लोभापाई पुढचे अनेक जन्म तिचेच चिंतन करतो.                              अश्याच एका आईचे जगाजसोर उभे असलेले उदाहरण हे तिच्या अफाट किर्तीचे , शौर्याचे आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवते .त्यांनी दिलेल्या संस्काराच्या बळावर केवळ ह्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एका आदर्शवान राजाचे नेतृत्व लाभले व त्याच राजाच्या नेतृत्त्वाखाली अखंड स्वराज्य स्थापन झाले. त्या आईच्या मायेने

शिवराज्याभिषेक सोहळा | Festival of Maratha Empire

                    "छत्रपती शिवाजी महाराज की" या वाक्यावर "जय !" बोलल्याशिवाय कोणी रहावणार नाही. कारण हे एक असे स्फूर्तीजनक वाक्य आहे जे महाराष्ट्रातील नव्हे तर देशापलीकडे असणार्‍या तमाम शिवभक्तांसाठी एक कानमंत्र आहे. ६ जून १६७४ रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा अगदी अश्याच उत्साहाने पार पाडला गेला. त्यावेळी फक्त स्वराज्यातील प्रजा नव्हे तर दूर पलीकडील राज्यप्रतिनिधी , सरदार , विदेशी व्यापारी तसेच कित्येक जनसमुदाय हा सोहळा बघण्यास उत्सुक होतं. खरतरं सोहळा हे निमित्तचं ,महाराजांच्या सावलीचे देखील दर्शन मिळाल्यास स्वतःला भाग्यवंत समजणारी ही रयत. आजही या सोहळ्याला एखाद्या उत्सवाप्रमाणे असंख्य जनसमुदाय त्याच जल्लोशात साजरा करतात.                      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून ते त्यांच्या अंतिम कारकीर्दीपर्यंत असंख्य मनामनांत एका सामर्थ्यशाली  राजासोबत एक आदर्श व्यक्तिमत्व उभे केले. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा प्राचीन परंपरेनुसार पार पडला. तसेच त्यातील